रत्नागिरी : महालेखापाल मुंबई व सहसंचालक (प्रशासन), संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३ या वेळेत कालावधित जि.प.च्या शामराव पेजे सभागृहात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. या पेन्शन अदालतीमध्ये महालेखापाल मुंबई कार्यालयाचे लेखा सर्वसाधारणचे ए. के. बेहरा, एस. एस. सरफरे, वरिष्ठ लेखाधिकारी एस. एस. बोडके, सहायक लेखाधिकारी डी. एन. पुजारी व एस. एस. शिंदे आदी अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांनी महालेखापाल मुबई यांच्याशी संबंधित असलेल्या भविष्य निर्वाह निधी, प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणे, उपयोगिता प्रमाणपत्रे तसेच संक्षिप्त व तपशिलवार देयके याबाबत काही पेंशनधारकांच्या काही अडचणी असल्यास सेवापुस्तकासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. अदालतीस वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
