रा.भा.शिर्के प्रशालेत ऊर्जा क्लबतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

0

रत्नागिरी : ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी देशात ऊर्जा संवर्धनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय जनजागृती मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचतीविषयी जाणीव निर्माण करुन ऊर्जा बचतीचे महत्व पालकांमध्ये तसेच समाजामध्ये पटवून देण्याच्या उद्देशाने रए.सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेत ऊर्जा क्लबची स्थापना करण्यात आली. ऊर्जा क्तबतर्फे दि.14 डिसेंबर से 20 डिसेंबर या कालावधीत ऊर्जा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला, प्रश्नमंजूषा, घोषवाक्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये इ.5 वी ते 10 वी तील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सदर ऊर्जा सप्ताहासाठी ऊर्जा क्लब समन्वयक एम.पी.बिरादार, सचिव सौ.एस.एन.पाटील, उपसचिव ए.पी.चव्हाण, यु.एस.लिंगायत, सौ.एस.के.कांबळे, श्री.एस.एस.पडवेकर, आर.एस.भारदे, सौ.ए.एन.अभ्यंकर, श्री.के.एस.वासावे, श्री.की.एस.मुंडेकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.जी.जी.गुळवणी, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी.चव्हाण, पर्यवेक्षक श्री.के.डी.कांबळे तसेच र.ए.सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री.सतीश शेवडे, सहकार्यवाह श्री.एन.टी.देवळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 14-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here