चिपळुणात आज लोकअदालत

0

चिपळूण : मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय व तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने चिपळुणात फिरत्या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत चिपळूणातील दिवाणी न्यायालय येथे लोकअदालत होईल, जी प्रकरणे तडजोडीने निकाली काढणे शक्य आहेत अशा संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक १६ रोजी तालुक्यातील कोंढे ग्रामपंचायत येथे कायदेविषयक शिबिर होणार आहे. यावेळी संबंधित वकील व मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 15-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here