जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मचे तात्काळ निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश

0

रत्नागिरी : ‘बर्ड फ्ल्यू’ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोंबडी व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मचे तात्काळ निर्जंतुकीकरण करावे असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 6 ते 8 लाख कोंबडी क्षमता असलेल्या 268 पोल्ट्रीफार्मवर खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील कुक्कुटपालकांनी घाबरून जाऊ नये, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर शिघ्र कृतीदल ची स्थापना करण्यात आली आहे. पथकाद्वारे जिल्ह्यातील पोल्ट्री शेडना भेटी देणे, पशुपालकांना या रोगाबाबत माहिती देणे, जनजागृती करणे, मृत झालेल्या पक्षांचे शवविच्छेदन करून नमुने पयोगशाळेकडे पाठविणे इ. कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्dयात कोणत्याही ठिकाणी कुक्कुट पक्षी, वन्य पक्षी आणि स्थलांतरीत पक्षी यांच्यात असाधारण मरतूक दिसुन येत असल्यास याबाबत सतर्प रहावे. पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती अथवा नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना अथवा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे तात्काळ संपर्प साधण्याचे आवाहन (टोल फि नंबर 18002330418) डॉ. पुजारी यांनी केले आहे. तसेच पोल्ट्री फार्मममधील पक्षांच्या, बदके, कावळे आदी जंगली पक्षांशी संपर्क होणार नाही याची दक्षता व्यावसायिकांनी घ्यावयाची आहे. जैवसुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे पशुसंवर्धन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मृत पक्षी आढळ्यास जिल्हा, तालुका स्तरावरील पशुसंवर्धन कार्यालयाला याची माहिती तत्काळ द्यावयाची आहे. कुक्कुटपालकांनी शेडच्या अंतर्गत व बाह्य भागात स्वच्छता मोहीम नव्याने राबवायची आहे. सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून कुक्कुटपालन शेडचे निर्जंतुकीकरण करायचे आहे. चिकन, अंडी 100 अंश सेल्सिअसमध्ये शिजविल्यानंतरच ती सेवन करावीत. चिकन स्वच्छ करताना हँडग्लोज प्राधान्याने वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 15-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here