‘त्या’ क्रेन चालकाविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : बेदरकारपणे क्रेन चालवून कार आणि दुचाकीला धडक देत दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी क्रेन चालक मबीन यासीन मल्लाजी (रा.एमआयडीसी, रत्नागिरी) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवारी दुपारी २.३० वा. सुमारास फिनोलेक्स कॉलनी येथील वळणावर घडली होती. या अपघातप्रकरणी संजय दिगंबर पेडणेकर (५९,रा.पोमेंडी बुद्रुक, रत्नागिरी) यांनी रात्री उशिरा शहर पोलिसांकडे तक्रार दिली.या अपघातात दुचाकी चालक प्रकाश विलास गोसावी (३२, रा.जांभूळफाटा मजगाव, रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 15-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here