‘एवढे प्रेम होते तर राष्ट्रवादी का सोडली?

0

पुणे : सातारकरांनी मते देऊन निवडून दिल्यानंतर राजीनामा देणारे छत्रपती उदयनराजे आज शरद पवार निवडणूक लढणार असतील तर उमेदवारी अर्ज भरणार नाही म्हणतात. त्यांचे शरद पवारांवर ऐवढे प्रेम होते, तर मग त्यांनी राष्ट्रवादी का सोडली? असा सवाल बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी उपस्थित केला. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदारांची सहानभुती मिळावी, म्हणून उदयनराजेंनी पवार प्रेम दाखवल्याचा आरोपही बिचुकले यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, आपल्या अखिल बहुजन समाज सेनेची घोषणा केली. तसेच आपला पक्ष महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवणार असल्याचे त्‍यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी बोलताना बिचुकले म्हणाले, मी सातारा लोकसभेची निवडणूक लढणार नाही. शरद पवार यांच्या विरोधात उदयनराजे तरी लढले नाहीत, तरी मी मात्र लढणार आहे. त्यांच्या विरोधात एक मत नाही पडले तरी चालेल. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलो तर माझे नाव इतिहासात नोंद होईल. शरद पवार यांनी राज्य सुजलाम सुफलाम केले आहे. गेली पाच वर्षे झोपलेल्या सरकारने आता शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्याची नगरसेवक होण्याची कुवत नाही, त्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावेळी जरी मी मुख्यमंत्री होऊ शकत नसलो तरी पुढील २०२४ च्या निवडणुकीत मी नक्की मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही बिचुकले यांनी यावेळी व्यक्त केला. उदयन राजेंना निवडून देऊनही त्यांनी राजीनामा दिला. आता त्यांनी राजेच रहावे, सातारकर जनता मला खासदार म्हणून निवडूण देईल, असेही ते म्हणाले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here