रेणू शर्माची प्रतिमा मलिन करण्यासाठीच आरोप; वकील त्रिपाठी यांचा दावा

0

मुंबई : “रेणू शर्मा यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे,” असा दावा रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी केला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या वकिलांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हनी ट्रॅपच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.

“रेणू शर्मा यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रेणूवर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्यावर त्याच उत्तर देतील. हनी ट्रॅप वैगरे काहीही नाही. जे आरोप आम्ही वाचले आहेत. त्या हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, असं म्हटलं जात आहे. मात्र असं काहीही केलेलं नाही,” असेही रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी म्हणाले. “या केसवरुन दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली. “रेणूवरील आरोप केवळ मीडियातून आले आहेत. त्याबाबत कुणीही आम्हाला नोटीस दिलेलं नाही. जेव्हा नोटीस येईल तेव्हा बघू. मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देऊ. मीडियाला देणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “या प्रकरणानंतर मला धमक्या देण्यात येत आहेत. काल सायंकाळी साडेसात वाजल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. तुम्ही केस सोडा, त्यांच्याविरोधात केस लढू नका असं धमकावलं जात आहे. मला फोनवरुन शिव्या घातल्या जात आहेत. वकिलाला घाबरवण्यापेक्षा कोर्टात जावं,” असेही ते म्हणाले.

त्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:49 PM 15-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here