राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ

0

◼️ पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस

मुंबई : देशासह राज्यात आजपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिली जाणार आहे. राज्यात पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे.

प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना आज सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे आत सर्वांची नजर ही लसीकरण मोहीमेवर असणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here