देवगड : हापूस आंबा जीआय नोंदणी केल्याशिवाय विकता येणार नाही, यामुळे आंबा बागायतदार व शेतकर्यांनी जीआयची लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष अॅड.अजित गोगटे यांनी केले. देवगड तालुक्यातील जीआय नोंदणीकृत 21 आंबा बागायतदारांना जीआय नोंदणीचे प्रमाणपत्र देवगड तालुका आंबा उत्पादक संस्था कार्यालयात वितरीत करण्यात आले यावेळी अॅड.गोगटे बोलत होते.संस्थेचे तज्ज्ञ संचालक ओंकार सप्रे, जयदेव कदम, रेश्मा जोशी, व्यवस्थापक संतोष पाटकर, राजेंद्र शेट्ये, राजा भुजबळ आदी उपस्थित होते. श्री.गोगटे म्हणाले,यापुढे हापूस आंबा विक्री करताना जीआय नोंदणी आवश्यक आहे.विक्रेत्यांनाही जीआय नोंदणी असल्याशिवाय हापूस आंबा विकता येणार नाही, असे सांगितले. ओंकार सप्रे म्हणाले, देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेच्यावतीने 2012 मध्ये देवगड हापूस जीआय मानांकन मिळावे यासाठी अर्ज करण्यात आला होता मात्र सुनावनीवेळी कोकण कृषी विद्यापीठाने आक्षेप घेवून पालघरपासून सिंधुदूर्गपर्यंत कोकणात हापूस सारखाच आहे,असे मत नोंदविले होत.यामुळे ‘अल्फान्सो’ हे जीआय मानांकन मिळाले असून यापुढे जीआय नोंदणी असल्याशिवाय आंबा विकता येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होवू शकते, असे सांगितले.यामुळे देवगड तालुक्यातील शेतकर्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. आभार रेश्मा जोशी यांनी मानले.
