रत्नागिरी शहरात श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ

0

रत्नागिरी : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर निर्माणाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी रत्नागिरी शहरातील राम मंदिर व मारुती मंदिर, रत्नागिरी येथे झाला. यावेळी मंगल महादेव पटवर्धन यांनी 13 हजार, श्रीराम मंदिर संस्था यांनी 11 हजार तर ब्रह्मरत्न या संस्थेने 5551 रुपये देणगी रूपाने दिली. यावेळी ब्रह्मरत्न संस्थेचे अध्यक्ष अनूप पेंडसे, सेक्रेटरी श्री कौस्तुभ जोशी, यश आंबर्डेकर, कौस्तुभ सरपोतदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीराम मंदिर संस्थेचे पदाधिकारी आणि राम भक्त उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here