कोरोनाची लढाई आता अंतिम टप्प्यात : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

0

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी देशात एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे. जगाताली सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमास आजपासून देशात सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधून या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ही लस करोना महामारीच्या विरोधात संजवीनी सारखं काम करेल आणि आता आपण या लढाईच्या अंतिम टप्प्यात आलोय, असे ते म्हणाले आहेत. ‘मी आज अत्यंत आनंदी व समाधानी आहे. आपण मागील वर्षभरापासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात करोना विरोधात लढाई लढत आहोत. करोना विरोधातील लढ्यात ही लस ‘संजीवनी’ म्हणून काम करेल असेही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले. यावेळी डॉ.हर्षवर्धन यांनी भारत बायोटेकने निर्माण केलेल्या कोव्हॅक्सिनची कुपी देखील माध्यमांना दाखवली. तसेच, ‘आपण या अगोदरही पोलीओ व कांजण्या या सारख्या आजारांना नष्ट केले आहे. भारताकडे अशाप्रकारच्या संकटांना सामोरे जाण्याचा बराच अनुभव आहे. हे कदाचित जगातील सर्वात मोठी लसीकरण अभियान आहे.’ असे देखील डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी बोलून दाखवले. आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. तर, लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी समस्त देशवासियांना या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छित आहे की, करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला डोस घेतला व नंतरचा डोस घेणं विसरले, अशी चूक करू नका. जसे की तज्ज्ञं सांगत आहेत, पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिनाचे अंतर ठेवले जाईल. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे आहे, दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या शरिरात करोनाच्या विरोधात लढण्यासाठीची आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. त्यामुळे लसीकरण होताच तुम्ही बेजबाबदारपणे वागायला लागला, मास्क काढून ठेवलं, सुरक्षित अंतर ठेवणं विसरलात.तर काही उपयोग होणार नाही. मी विनंती करतो की असं करू नका.’

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:44 PM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here