पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नैतिकता पाळावी. सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर आहेत, असे म्हटलं होते. शरद पवार कडक धोरण स्वीकारतात. त्यांनी 50 वर्षाच्या जीवनात आरोप झाल्यानंतर त्या व्यक्तीला पाठीशी घातले असे झाले नाही, पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने भ्रमनिरास झाला, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:22 PM 16-Jan-21