‘मुख्यमंत्री खुलासा करतील का?, शरद पवार-नांगरे पाटील यांच्या भेटीचे औचित्य काय ?’

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावर भाजप नेते निलेश राणे यांच्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप नोंदवित प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री खुलासा करतील का? आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील शरद पवारांना भेटले. ही भेट खाजगी की कार्यालयीन ?, पोलीस गणवेशात भेट घेण्याचे औचित्य काय?, हा प्रकार प्रशासकीय शिष्टाचाराचा भंग म्हणावा का ? मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांचं स्पष्टीकरण द्यावं. दरम्यान राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका राजकीय नेत्याला अशा प्रकारे भेटण्यामागचा उद्देश लोकांना समजला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:22 PM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here