रत्नागिरीतील अ‍पेक्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाची मोफत तपासणी

0

रत्नागिरी : येथील नव्याने सुरू झालेल्या अ‍पेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविडचे निदान करण्यासाठी करण्यात येणारी आरटीपीसीआरची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत अ‍पेक्स हॉस्पिटलने कोविड रुग्णालय म्हणून सेवा बजावली. चार महिन्यांत तेथे कोविडच्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. आता शासनाच्या मान्यतेने तेथे आरटीपीसीआर तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या रुग्णांना कोविडची चाचणी करायची आहे, त्यांनी रुग्णालयात येऊन आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालयाचे संचालक डॉ. सुशीलकुमार मुळ्ये यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी होऊ लागल्यामुळे अ‍पेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नियमित रुग्णालय सुरू करण्यात आली. सध्या तेथे २४ तास अपघात विभाग सुरू आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, रेडिओलॉजिस्ट डॉ. सौ. मीरा मुळ्ये यांच्यासह आर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. डी. बी. क्षीरसागर, फॅमिली मेडिसिन डॉ. रवींद्र गोडे उपचार करत आहेत. सीमेन्स कंपनीचे अत्याधुनिक मल्टीस्लाइज मल्टीडिटेक्टर सी. टी. स्कॅन मशीनही येथे उपलब्ध आहे. स्ट्रेस टेस्ट, पीएफटी, डिजिटल एक्सरे, अत्याधुनिक कलर डोपलर सोनाग्राफी इत्यादी सुविधाही तेथे उपलब्ध आहेत. करोनाविषयक तपासणी मोफत होणार असल्याने रुग्णालयाच्या सेवेत आणखी एका चांगल्या सुविधेची भर पडली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:52 PM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here