भारत वि. ऑस्ट्रेलिया : चौथा कसोटी सामना : भारतापुढं विजयासाठी 328 धावांचं आव्हान, पावसामुळं खेळ थांबला

0

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यावर क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघात बरेच बदल केले गेले असून, बरेच नवे चेहरे संघात मोलाचं योगदान देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, सध्याच्या घडीला या कसोटी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी मालिका 1-1 अशा बरोबरीनं पुढे आणली आहे. तर, चार सामन्यांपैकी एक सामना हा अनिर्णित राहिला होता. परिणामी चौथा सामना हा निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघात दुखापतग्रस्त खेळाडूंमुळं टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात आलं आहे. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघातून पुकोवस्कीच्या स्थानी हॅरिसला स्थान देण्यात आलं आहे. टी नटराजन हा एक असा पहिला खेळाडू आहे, ज्याला एकाच दौऱ्यामध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये अर्थात एकदिवसीय, टी20 आणि कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघानं अॅडिलेड कसोटीमध्ये 8 विकेटनं सामना खिशात टाकला होता. तर, मेलबर्न कसोटीवर भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं. सिडनी कसोटीमध्ये दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली. अखेर या चुरशीच्या लढतीमध्ये सामना अनिर्णित राहिला होता. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अखेरच्या आणि महत्त्वाच्या अशा सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारतीय गोलंदाजांनी हे आव्हान पेलत दमदार गोलंदाजीनं संघाला सुरुवात करुन दिली. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराज यानं संघाला मोठं यश मिळवून दिलं. पहिल्याच षटकात त्यानं डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला हादरा दिला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:11 PM 18-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here