मेर्वीत माघी गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम

0

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी खरडेवाडी क्रीडा मंडळ मुंबईतर्फे माघी गणेशोत्सव निमित्त कै. श्री. अर्जुन ल. खरडे यांच्या स्मरणार्थ भव्य ओपन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा खरडेवाडी मेर्वी येथे दि. २३ जानेवारी रोजी कोरोना विषयी महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या नियमांची अंमलबजावणी करूनच प्रारंभ होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेतील विजेता प्रथम पारितोषिक रोख रक्कम ११०२१ रुपये व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ८०२१ रुपये व आकर्षक चषक, मालिकावीरास रोख रक्कम व आकर्षक चषक उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम व आकर्षक चषक दिला जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजास रोख रक्कम व आकर्षक चषक स्पर्धेतील विजेत्या संघाना खरडेवाडी क्रीडा मंडळ मंबईचे कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ नवाले, अध्यक्ष दीपक खरडे, उपाध्यक्ष शैलेश खरडे, सचिव विनोद खरडे, खजिनदार महेंद्र खरडे, अनिल नवाले, कला विभाग प्रकाश खरडे, अंकुश खरडे, क्रीडा विभाग प्रवीण खरडे, उत्तम खरडे, सांस्कृतिक विभाग वैभव खरडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:48 PM 18-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here