शिवसैनिकांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त खोटे

0

लांजा : तालुक्यातील गवाणे जि.प.गटातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशा आशयाच्या बातम्या ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्या जात असून, त्या धादांत खोट्या आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकच काय पण एक मतदारही भाजपात गेला नसल्याचा निर्वाळा शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे यांनी दिला आहे. गवाणे जि. प. गटातील विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भाजप प्रवेश सोहळा नुकताच गवाणे येथे पार पडला. यावेळी झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात गवाणे गटातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून जर आमच्या विभागात विकासकामे होत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो. विकासकामात शिवसेनेने कधीही राजकारण आणले नाही. परंतु जर का कोणी विनाकारण राजकारण करून शिवसेनेला डीवचण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही. जे सत्य आहे तेच लोकांसमोर मांडा. उगाचच स्वत:चा ऊर बडवून पक्ष प्रवेशाच्या गप्पा मारू नका. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोकांची प्रत्येक निवडणुकीत निशाणी वेगळी असते. हा त्यांचा आजवरचा इतिहास आहे, असे करंबेळे यांनी म्हटले आहे.

HTML tutorialLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here