अधिकाऱ्यांनी पारदर्शी निवडणुकीसाठी काम करावे

0

रत्नागिरी : विधानसभा निवडणूक २०१९ अंतर्गत मतदानाचा टक्का वाढवणे व शांततापूर्वक वातावरणात पारदर्शीपणे मतदान व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. निवडणूक पूर्वतयारी संदर्भात जिल्ह्यातील पाच मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी व विविध नोडल अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी नुकतीच रत्नागिरी येथे घेतली. बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक पूर्वतयारीचा यावेळी विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी बेलदार यांनी यावेळी आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक विषयक कायदे याबाबत सादरीकरण केले.मालमत्ता विद्रुपीकरण संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करावी, याबाबत असलेल्या कायद्यातील कलम ७ अनुसार धडक कारवाई करून पाच पट दंड लावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. निवडणूक काळात आचारसंहिता भंग होणार नाही, यासाठी सतर्क रहा असे सांगून चव्हाण म्हणाले की सर्वांनी नेमून दिलेले कामयोग्यरित्या करण्याची खबरदारी घ्यावी. पोलिस प्रशासनाची भूमिका आणि विविध प्रकारची कामेव तयारी याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मार्गदर्शन केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here