परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसखोरी

0

सिंधुदुर्ग : परराज्यातील कोणत्याही मासेमारी नौकेला महाराष्ट्र सागरी हद्दीत 12 सागरी मैल आत येऊन मासेमारी करण्यास मनाई असतानाही सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी करत धुमाकूळ घातला आहे. झुंडीने दाखल होणारे हे ट्रॉलर मासळीची लूट करत असून समुद्रात मासेमारी करणाऱ्या सिंधुदुर्गातील मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान करत आहेत. रात्रीच्या वेळी दिवे बंद करून हे ट्रॉलर मासेमारी करतात. यावेळी स्थानिक मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात टाकलेल्या जाळ्यांवरून हे ट्रॉलर जात असल्याने जाळी तुटून नुकसान होत आहे. या प्रकारामुळे मच्छिमार हवालदिल झाले असून भीतीचे वातावरण आहे. मत्स्य विभागाने कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:19 PM 21-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here