रत्नागिरी : तालुक्यातील ओरी येथे सामाईक माडाचे नारळ काढण्यावरून सख्ख्या भावाला शिवीगाळ करत लोखंडी शिगेने मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार, दि. २० जानेवारी रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास घडली. लहू देवदास जाधव (४०, रा. ओरी बौध्दवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात अंकुश देवदास जाधव (४०, रा, ओरी बौद्धवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 22-Jan-21