मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटला दिली भेट

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ची निर्मिती करणाऱया पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगडोंबामध्ये 5 कंत्राटी कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न केले आणि दोन तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोविशिल्ड लसनिर्मिती प्लांट पूर्णपणे सुरक्षित आहे. आग कशामुळे लागली याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:36 PM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here