मुंबई : काँग्रेस पक्षाला देशासह राज्यातील नेतृत्वावरुन सध्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत. वेगवेगळी नावं पुढं येत असताना आता काही नेत्यांनी पुन्हा बाळासाहेब थोरात यांच्याकडेच महाराष्ट्राचं नेतृत्व देण्यात यावं अशी मागणी केली आहे. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजेत, तर पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही असं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे त्यांनी आपलं हे मत अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिवांसमोर व्यक्त केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:08 PM 22-Jan-21
