रत्नागिरीतील विवेक सोहनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील विवेक सोहनी यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच होण्याचा बहुमान पटकावला आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेची प्रेसिडेंशिअल बोर्ड मीटिंग हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे सात आणि आठ सप्टेंबरला झाली. त्या वेळी सोहनी यांच्या आंतरराष्ट्रीय पंच पदवी निश्चित करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत त्यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘चेसमेन, रत्नागिरी’ या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध जिल्हास्तरीय स्पर्धांमधून पंच म्हणून काम करत असताना विवेक यांना रत्नागिरीच्या चैतन्य भिडे यांनी राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. २०१६ साली नागपूर येथे झालेल्या या परीक्षेत उत्तीर्ण होऊन विवेक यांनी संपूर्ण देशात आठवा क्रमांक मिळवला. २०१७साली दिल्ली येथे जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून घेण्यात आलेल्या फिडे आर्बिटर परीक्षेत विवेक यांनी अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धामध्ये काम करता करता त्यांनी ‘फिडे आर्बिटर’ ही पदवीही मिळवली.अवघ्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत विवेक यांनी ५०हून अधिक आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करून नावलौकिक मिळवला आहे.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here