थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या

0

◼️ मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती, पुतळा अनावरणासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार

◼️ रत्नागिरी : नाणार रिफायनरी साठी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंटतर्फे प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा

◼️ रत्नागिरी : रत्नागिरीत उद्या रविवारी नारळ लागवडीबाबत सेमिनार

◼️ मुंबई : राज्यात आतापर्यंत ७४ हजार कर्मचाऱ्यांना देण्यात आली कोरोना प्रतिबंधक लस

◼️ नोएडामध्ये 26 जानेवारीला आंदोलने होऊ नयेत म्हणून 144 कलम लागू केले.

◼️ संगमेश्वर : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.66 ला लागून असणारा आंबेड बुद्रुक गावाजवळील खड्डे भरण्यास सुरुवात

◼️ शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये चार नेत्यांच्या हत्येचा कट, संशयित प्रसारमाध्यमांसमोर हजर, शेतकरी नेत्यांचा खबळजनक दावा

◼️ मुंबई : कोविन अॅपमधील अडथळे दूर होताच मुंबईत 92 टक्के लसीकरण, तर सर्वात जलद दहा लाख डोस देण्यात भारत जगात अव्वल

◼️ अहमदनगर : अण्णा हजारे यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना अपयश, 30 जानेवारीपासून उपोषण करण्यावर अण्णा हजारे ठाम

◼️ वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचे छापे, तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर पुतणे मेहुल ठाकूर आणि कंपनीच्या सीएला अटक

◼️ पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत एक हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान, तर कोविशील्ड लस पूर्णत: सुरक्षित, अदर पुनावाला यांची माहिती

◼️ बर्ड फ्लूने माणसाचा मृत्यू झाला असेल तर शोधून द्या, रोख बक्षिस देईन, मंत्री सुनील केदार यांचं आव्हान; चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनावर मात करण्यास शक्ती मिळत असल्याचाही दावा

◼️ तामिळनाडू : गावकऱ्यांनी पेटवलेला टायर हत्तीच्या कानात अडकला, तामिळनाडूच्या मसिना गुडी गावातील घटना, उपचारादरम्यान हत्तीचा मृत्यू

◼️ नवी दिल्ली : 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा हद्दपार होण्याची शक्यता, नोटा परत घेण्यासाठी मोहीम आखा, आरबीआयचे बँकांना आदेश

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:29 AM 23-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here