रत्नागिरी : सागरमाला योजनेअंतर्गत कोकणातील ५ बंदरांच्या विकासासाठी केंद्राने सव्वाचारशे कोटीचा निधी मंजूर केला आहे.चालू आर्थिक वर्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत या बंदराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मत्स्य विकाससाठी आवश्यक लागणाऱ्या पायाभुत सविधा येथे उभारण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा या बंदराचा समावेश आहे. यासाठी ७१ कोटी ८० लाख ८८ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. याच बरोबर कोकणातील अर्नाळा बंदरास ६१ कोटी ५६ लाख, ससून डॉक बंदराच्या आधुनिकीकरणासाठी ५२ कोटी १७ लाख, कारंजा बंदराच्या सुधारीत विकास आरखडा अमंलबजावणीसाठी १४९ कोटी ८० लाख तर आनंदवाडी बंदरास ८८ कोटी ४४ लाख रूपये मंजूर झाले आहेत.
