निवडणुकीत सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच

0

गिमवी : विधानसभा निवडणूक कालावधीत खोटी माहिती, फोटो, व्हीडिओ, बातम्या शेअर करून तणाव निर्माण करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा वॉच असणार आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवरील सायबर पोलिसांची टीम सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांवर तत्काळ कारवाई करणार आहे. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही सायबर पोलिसांचे लक्ष असणार आहे. निवडणूक कालावधीत जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशाप्रकारे माहिती, छायाचित्र किंवा व्हीडिओ शेअर करणे गुन्हा आहे. सोशल मीडियावरून खोटी माहिती शेअर केल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिस दक्ष असणार आहेत. निवडणूक कालावधीत शेअर केल्या जाणाऱ्या राजकीय पोस्टमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असेल तर तत्काळ ती पोस्ट डिलीट करण्यासाठी उपाय केले जाणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाला कळवून तत्काळ कारवाई केली जाईल. निवडणूक कालावधीत फोटो किंवा व्हिडीओ एडिट करून एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणे तसेच व्यक्तिगत आरोप व टीका करणे हा सायबर गुन्हा आहे. जर निवडणूक कालावधीत अशा पोस्ट कोणी शेअर केल्या तर आधी त्या डिलीट केल्या जातील, त्या व्हायरल होऊ नये यासाठी सूचना दिली जाईल, संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल. निवडणुकीत उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती निवडणूक आयोग घेणार आहे. सायबर पोलिसांकडून राजकीय नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष असणार आहे. निवडणुकीवर किंवा मतदानावर परिणाम व्हावा, या उद्देशाने एखादी खोटी माहिती सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी निवडणूक कालावधीत सोशल मीडिया वापरताना दक्ष रहावे. राज्य आणि जिल्हा पातळीवर सायबर पोलिसांची टीम सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असणार आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here