गुगलचा आज २१वा वाढदिवस

0

नवी दिल्‍ली : सर्वांच्‍या लाडक्‍या गुगलचा आज वाढदिवस आहे. प्रत्‍येक प्रश्‍नाचे उत्तर ज्‍याच्‍याकडे आहे अशा सर्वज्ञ, सर्वांच्‍या जवळच्‍या गुगलचा आज (ता.२७)  २१वा  वाढदिवस आहे. यानिमित्त गुगलने खास डुडल साकारले आहे. गुगल हे कोणासाठी गुरु तर कोणासाठी मित्र म्‍हणून भूमिका निभावत असते. कारण गुगलकडे आपल्‍या प्रत्‍येक प्रश्‍नाचे उत्तर  असते.  एका क्लिकवर गुगल सर्व जगाची सफर करते म्‍हणजे माहिती देते. गुगल डुडलच्‍या माध्‍यामातून जगातील  प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस विशेष डुडल साकारत असते. या डुडलच्‍या माध्‍यामातून त्‍यांच्‍याविषयी माहिती देण्‍याचा प्रयत्‍न गुगल करत असते. यामुळे आपल्‍या ज्ञानात भरच पडत असते. आज देखील अशाचप्रकारे डुडलच्‍या माध्‍यमातून गुगलचा प्रवास दाखवण्‍यात आला आहे.  गुगलची स्थापना : सर्गेई ब्रिन आणि लैरी पेज यांनी १९९८ मध्ये  गुगलची स्थापना केली होती. जगभरातील ४० पेक्षा जास्त देश गुगलचा वापर करतात. गुगलची जगभरात ७० पेक्षा जास्त कार्यालये आहेत. माहितीचे सारे युग गुगलने आपल्यात सामावून घेतले असून जगापुढे माहितीचे भांडार खुले करून दिले आहे. गुगलचा पहिला वाढदिवस : गुगलने आपला पहिला वाढदिवस १९९८ साली  साजरा केला होता. पण तरीही तारखेवरुन वाद कायम होता. त्यानंतर १७ व्या वाढदिवसापासून २७ सप्टेंबरलाच गुगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागले. त्यानुसार  आज गुगलचा २१ वा वाढदिवस आहे. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गुगल पहिल्यांदा जगासमोर आले. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गुगलची स्थापना झाली. आज इंटरनेट सर्च इंजिन म्‍हटले की, गुगलचे नाव सर्वात पहिले येते. गुगलचे पहिले डुडल : कंपनीने १९९७ साली  डोमेन रजिस्टर केले आणि अधिकृतपणे ‘गुगल’ असे नाव ठेवण्यात आले. यानंतर गुगलने २००२ साली पहिल्यांदा डूडल तयार केले. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गुगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करत असते. यातून महितीचा खजिना गुगल आपल्‍यासाठी खुला करत असते. आजच्‍या गुगल डुडलमध्‍ये काय आहे ? नेहमी दुसर्‍यांचा वाढदिवसानिमित्त विशेष डुडल करणार्‍या गुगलने आपल्‍या वाढदिवसानिमित्त गुगलच्‍या आजपर्यंतच्‍या  प्रवासाचा उलगडा डुडलच्‍या माध्‍यमातून केला आहे. यामध्‍ये २० व्या शतकाच्या अखरीस वापरात असलेला कम्प्युटर दाखवला आहे. २७ सप्टेंबर १९९८ रोजी गुगलच्या कार्यालयात घेतलेला फोटो डुडलला लावण्‍यात आला आहे. या काम्प्युटर सोबत मॉनिटर, कीबोर्ड, माउस आणि प्रिंटरही दाखवण्यात आला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here