राज्य आदर्श क्रीडाशिक्षक विनोद मयेकर यांचा शिर्के प्रशालेत सत्कार सोहळा

0

रत्नागिरी : स्वप्न साकारण्यासाठी शिक्षक कार्यरत असतात, म्हणूनच ते प्रिय असतात. शिक्षकांचे स्थान सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेतर्फे महाराष्ट्र राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रशालेचे क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांचा सत्कार सोहळा माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्या हस्ते बुधवारी आयोजित करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाक्रीडाधिकारी किरण बोरवडेकर ,संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, मुख्याध्यापिका जी.जी. गुळवणी, सहकार्यवाह नथुराम देवळेकर, विश्वस्त रघुवीर भिडे, मंदा मयेकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका जी.जी. गुळवणी यांनी प्रास्ताविकात विनोद मयेकर यांनी अठरा वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवल्याचे सांगितले. कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त करताना दुसाऱ्यासाठी सतत झटणारा, आपला विद्यार्थी मोठा व्हावा, यासाठी धडपडणारा शिक्षक म्हणजेच विनोद मयेकर असल्याचे सांगितले. मान्यवरांचे हस्ते विनोद मयेकर यांनाशाल, श्रीफळ,मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपकार्याध्यक्ष विजय साखळकर, जिल्हाक्रीडाधिकारी किरण बोरवडेकर, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, गणेश गुळवणी, किर्ती पावसकर, नीरजा मयेकर, सत्कारमूर्ती विनोद मयेकर यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचलन स्नेहा साखळकर यांनी तर आभारप्रदर्शन चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमावेळी प्रशालेतर्फे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here