भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांचा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारानं सन्मान

0

तरूण भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना गणितातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. निखिल श्रीवास्तव हे गेल्या अनेक काळापासून कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफवर अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अन्य दोन विजेत्यांसह संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, वर्कलेचे निखिल श्रीवास्तव, इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी लॉसानंचे अॅडम मार्क्स आणि येल विद्यापीठाते डॅनिअल अॅलन स्पिलमॅन यांना २०२१ चा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायंसेजनं दिली. पदक आणि १ लाख डॉलर्स असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. निखिल श्रीवास्तव, मार्क्स आणि स्पिलमॅन यांनी कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफशी निगडीत गेल्या मोठ्या कालावधीपासून अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत. या प्रक्रियेत रेखीय बीजगणित, बहुपदी भूमिती आणि आलेख सिद्धांत यांच्यातील एक नवीन नव्या संबंधांचा शोध घेण्यात आला आहे. निखिल श्रीवास्तव हे सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणिताचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:28 PM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here