चांद्रभूमीवर विक्रम लँडर; नासाने शेअर केले फोटो

0

नवी दिल्‍ली : अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे उतरवण्यात आले त्या लँडींग साईटचे फोटो ट्विटच्‍या माध्‍यमातून शेअर केले आहेत. यासोबतच विक्रम लँडरचा अचूक पत्ता सांगता येणार नसल्‍याचे नासाकडून सांगण्‍यात आले आहे. नासाकडून  ट्विटरवरुन लुनार रिकन्सेन्स ऑर्बिटरच्या (एलआरओ) माध्यमातून काढलेले फोटो शेअर करण्‍यात आले आहेत. या हाय रेझोल्यूशन इमेजेस आहेत. नासाच्या एलआरओने काढलेले फोटो हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून ६०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पृष्ठभागाचे आहेत. नासाने आपल्‍या ट्विटमध्ये म्‍हटले आहे की, चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचे हार्ड लँडींग झाले आहे. आमच्या एलआरओने भारताचे चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर जिथे उतरले त्या पृष्ठभागाचे फोटो काढले आहेत. हे फोटो संध्याकाळच्या वेळी काढण्यात आल्याने या फोटोंमध्ये लँडर नक्की कुठे आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. ऑक्टोबरमध्ये एलआरओ पुन्हा या भागावरुन जाणार आहे तेव्हा आणखीन फोटो काढले जातील. त्यावेळी या भागात चांगला प्रकाश असेल,’ असे  देखील नासाने म्‍हटले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here