फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रत्नागिरीत : अॅड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन मा. दादांना रत्नागिरी दौऱ्याचे निमंत्रण दिले. माहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी रत्नागिरी येथे एक दिवशीय दौऱ्यासाठी येण्याचे मान्य केले आहे. आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मा.चंद्रकांतदादा यांची कोल्हापूर निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी अॅड.बाबासाहेब परुळेकर हेही उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २९६ सदस्य निवडून आणण्यात प्राप्त झालेले यश अभिनंदनीय आहे. रत्नागिरी येथील युनिटीचे काम उत्तम सुरू आहे. संघटनात्मक ताकद वाढीचे प्रत्यंतर येत आहेत असे सांगत दादांनी जिल्हा टीमचे अभिनंदन केले. तसेच लवकरात लवकर भा.ज.पा. कार्यालयासाठी स्वतंत्र १० गुंठे जागा खरेदी करण्यासाठी जागेची निश्चिती करण्याचे निर्देश दादांनी दिले असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. बूथ प्रमुखरचना, शक्ती केंद्रप्रमुख यांचा आढावा मा.प्रदेशाध्यक्षांना दिला. प्रत्येक बुथचा दौरा करण्याचे व बुथ प्रमुख व बूथची टीम ही संकल्पना अधिक गतिमान व क्रियाशील करण्याचे निर्देश दादांनी दिले. त्यानुसार कार्यक्रम आखून २७ जानेवारीपासून आपण पूर्ण दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे अॅड.पटवर्धन यांनी सांगितले. भा.ज.पा.ने ग्रामपंचायत निवडणूकीत उभे केलेले उमेदवार, विजयी उमेदवार, सर्व कार्यकर्ते मंडळ, जिल्हा कार्यकारणी, विविध मोर्चा, आघाड्या या सर्वांचे मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे अॅड.पटवर्धन यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये मा.चंद्रकांतदादा रत्नागिरी येथे येत आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्याचा उचित लाभ घेत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे अॅड.बाबा परुळेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:45 PM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here