चिपळूण : येथील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्र लवकरच सुरू करावे, अन्यथा २६ जानेवारीपासून आपण बेमुदत उपोषण करू, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिला आहे. या बाबत त्यांनी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना पत्र दिले आहे. नलावडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. अन्य किरकोळ काम करून सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करावे, या मागणीसाठी आपण २६ रोजी उपोषण करीत असून याची दखल घ्यावी, अशी विनंती नलावडे यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 26-Jan-21