असभ्य वर्तन प्रकरणी बीसीसीआय कनिष्ठ अधिकाऱ्याला क्लीन चीट

0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने नुकताच वेस्ट इंडिज दौरा केला. या दौऱ्यावेळी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एक कनिष्ठ व्यवस्थापकावर असभ्य वर्तनाचा आरोप झाला होता. अँटिग्वाच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने भारतीय संघातील एका कनिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप केला होता. पण चौकशीअंती या प्रकरणात महिलेचा चुकीचा समज  झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे या कनिष्ठ अधिकाऱ्याला क्लीन चीट देण्यात आली. असा दावा बीसीसीआयचे माजी व्यवस्थापक  सुनिल सुब्रमण्यम यांनी केला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला २५ सप्टेंबरला पाठवलेल्या एक मेल पीटीआयच्या हाती लागला आहे. यात सुब्रमण्यम यांनी पहिल्यांदा अशी घटना घडल्याचा दावा केला होता. नंतर त्यांनी हा दावा मागे घेतला. बीसीसीआयने अँटिग्वाच्या हॉटेलमध्ये अशी घटना घडल्याचे मान्य केले आहे पण, यात त्या महिलेचा चुकीचा समज झाल्याचे सांगितले. त्यामुळे अँटिग्वा पोलिसांच्या चौकशीत सपोर्ट स्टाफ अधिकाऱ्याला क्लीन चीट मिळाली आहे. बीसीसाीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की ‘ज्यावेळी या प्रकरणाची चौकशी करण्यात आली त्यावेळी हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे समोर आले. ज्या महिलेने असभ्य वर्तनाचे आरोप केले होते तिला सपोर्ट स्टाफ सदस्यांचा फोटोदाखवण्यात आला. यात आरोप असलेल्या सदस्याचाही समावेश होता त्यावेळी तिने यापैकी कोणालाही आळखले नाही. याचबरोबर तिने सांगितलेला रुम नंबरही भारतीय संघाच्या कोणत्याही सदस्याच्या रुम नंबरशी जुळला नाही.’ सुब्रमण्यम यांच्यावर वेस्ट इंडीज मधील भारतीय उच्चायुक्तालयातील एका बड्या अधिकाऱ्याबरोबर उद्धट वर्तन केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ तात्काळ संपवण्यात आला. त्यांनी या असभ्य वर्तन प्रकरणात प्रशासकीय समितीला पहिल्यांदा केलेल्या मेलमध्ये तपासात सपोर्ट स्टाफमधील त्या कनिष्ठ अधिकारी दोषी असेल्याचे नमुद केले होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here