मुंबई-गोवा महामार्गावर दोन स्वीफ्ट कारची समोरासमोर जोरदार धडक, 9 जण जखमी

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील निगडे गावानजीक मंगळवारी दोन स्वीफ्ट कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 9 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. सावंतवाडी येथील शिवलकर कुटुंबीय सावंतवाडी ते मुंबई असे आपल्या ताब्यातील स्वीफ्ट डिझायर कारने प्रवास करत होते. मात्र वाटेतच मुंबई-गोवा महामार्गावर खेडमधील निगडे गावानजीक पेट्रोल पंपासमोर ते आले असता समोरून खेड ते चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट कारचा आणि त्यांच्या स्वीफ्ट डिझायर कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात शिवलकर कुटुंबातील सहा जण तर स्वीफ्ट कारमधील तीन जण जखमी झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 27-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here