साखरपा येथे बंद घर फोडून दिड लाखांचा ऐवज चोरीस

0

साखरपा बाजारपेठेनजीक रत्नागिरी कोल्हापुर महामार्गावरील रस्त्याशेजारी असणारे हुसेन रमदूल यांचे बंद असलेले घर अज्ञात चोरटयांनी फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे दिड लाखाचा ऐवज लुटला.
या घरात ते स्वतः व त्यांची पत्नी व मुलगा राहतात.त्यांचा मुलगा कामानिमित्त रत्नागिरी येथे असल्यामुळे ते दि.२१/०९/२०१९ ला त्याच्याकडे कारवांचीवाडी रत्नागिरी येथे गेले होते .त्यानंतर गुरुवार दि.२६ ला घरी परतले असता बंद घराचा दरवाजा उघडा दिसला व घरातील सामान विस्कटलेल्या अवस्थेत आढळले.तसेच घरातील गोदरेजचे कपाट फोडलेले दिसले .त्या कपाटातील सोन्याच्या बांगड्या, अंगठी असा सुमारे साडेसहा तोळ्याचा ऐवज लंपास झालेला दिसला. त्याचप्रमाणे दहा हजार रुपयाची रोख रक्कम चोरटयांनी गायब केलेल्याचे आढळून आले. सुमारे 1,43000 लाख इतका ऐवज चोरटयांनी लंपास केला
रमदूम यांनी या घटनेची माहिती त्यांनी साखरपा दूरक्षेत्राला कळवली .साखरपा पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अज्ञात
चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे .सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुषार सातपुते स.फौजदार उकार्डे कॉ.चव्हाण हे करत आहेत .लवकरच या चोरीचा छडा लावणेचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दोन महिन्यापुर्वी भरवस्तीत हि दोन घरफोड्या झाल्या होत्या. पोलीसांनी अधिक तपास सुरु असून.रत्नागिरीहून श्वान पथक आणणेत आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here