उध्दव ठाकरेंच्या सुपुत्राने शोधला दुर्मिळ प्रजातीचा साप, ‘ठाकरे कॅट स्नेक’असं मिळालं नाव

0

मुंबई | सुरूवातीपासूनच राजकारणापासून दूर असलेले उध्दव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांनी सापाच्या एका नविन प्रजातीचा शोध लावला आहे. राज्यातील पश्चिम घाटात एक अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा साप सापडला आहे. तेजस यांनी या सापाबाबत केलेल्या अथक संशोधनामुळे सापाच्या या प्रजातीला ‘ठाकरे कॅट स्नेक’ असे नाव देण्यात आले आहे. शास्त्रीय भाषेत याला बोईगा ठाकेरायी असं नाव देण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात या सापाबाबतचे संशोधन केले जात होते. जैवविविधता संरक्षण संस्थेच्या वरद गिरी यांनी या सापाबाबतच्या संशोधनाबाबत बोलताना सांगितले की हा साप कॅट स्नेक या गटात मोडणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here