जुना माळ येथील तारा पार्क येथे 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक मृत्यू

0

रत्नागिरी : शहरातील जुना माळ नाका येथील तारा पार्क या इमारतीच्या टेरेसवर खेळणाऱ्या 11 वर्षीय मुलीचा कपड्याच्या दोरीत अडकून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी सर्वजण घरात असताना कनिका चुनेकर ही 11 वर्षीय मुलगी टेरेसवर खेळत होती. बराच वेळ मुलगी घरात न आल्याने मुलीची आई टेरेसवर शोधण्यासाठी गेली असता कनिकाच्या गळ्यात कापडा अडकलेला पहिला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मूलगीचा या घटनेत मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पोलिसांचा या घटनेबाबत सखोल तपास सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:09 AM 28-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here