रत्नागिरीत झालेल्या भीषण अपघातात वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू

0

रत्नागिरी – बोलेरो पिकअप व दुचाकी याची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन वर्षीय चिमुरडीसह वडिलांचा मृत्यू झाला. शुक्रवारी खेडाशि मार्गावर हा अपघात झाला. सागर आनंद सुर्वे (वय ३५) आणि सान्वी सागर सुर्वे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. मृत सागर सुर्वे हे निवळी कोकजे वठार गावचे शिवसेना शाखा प्रमुख होते.

HTML tutorial

सागर सुर्वे यांच्या दुचाकीला रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअपने समोरून धडक दिली. या अपघातात सागर सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची तीन वर्षाची मुलगी सान्वी ही गंभीर जखमी झाली. यावेळी हातखंबा येथे निघालेल्या ऋषिकेश चंद्रकांत शितप या प्रवाश्याने सान्वीला तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करून सागर सुर्वे यांचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here