भाजप नेत्यांकडून अण्णा हजारेंची मनधरणी सुरु, गिरीश महाजन दुसऱ्यांदा अण्णांच्या भेटीला

0

अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही एकदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती. आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. गेल्या 2 महिन्यांपासून अगोदरच दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. अशा परिस्थितीत जर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु असल्याचं बोललं जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:25 AM 28-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here