नुकत्याच रत्नागिरी येथे झालेल्या शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धेत पटवर्धन हायस्कुल रत्नागिरीच्या सई संदेश सावंत हिची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रिडा संकुल, शिवाजी स्टेडियम ,रत्नागिरी येथे 24,25 सप्टेंबर रोजी शालेय स्तरावरील विभागीय तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 52 किलो वजनी गटात पटवर्धन हायस्कुल रत्नागिरीची विद्यार्थिनी सई संदेश सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवला. यापुढे गोंदिया येथे 3 ते 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद कदम यांनी तिचे कौतुक केले. शाळेतील सर्व शिक्षक, क्रीडाशिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
