फसवणूकीप्रकरणी तीन महिलांसह सात जणांना अटक

0

गुहागर : सोन्याचे खोटे दागिने गहाण ठेवून वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेची नऊ जणांनी १४ लाख ६३ हजार ७०३ रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुहागर, नवानगर, वेलदूर, असगोली या चार गावातील सात जणांना अटक केली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. याच प्रकरणात पूर्वी अटक केलेल्या एका आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. तर एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात अटकेत आहे. वेलदूरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून आठ जणांनी १४ लाख ६३ हजार ७०३ रुपयांची फसवणूक केली. अशी तक्रार विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरचे व्यवस्थापक मकरंद पत्की यांनी १३ नोव्हेंबर २०२० ला गुहागर पोलिस ठाण्यात केली होती. त्यामध्ये ८ जणांसह बँकेचे सोनाराचा समावेश आहे. या ८ जणांमधील मनोहर महादेव घुमे (रा. असगोली), गणेश शंकर कोळथरकर (रा. नवानगर), श्रीमती सुलोचना दत्ताराम पावसकर, शबीया उमरखान परबुलकर (रा. नवानगर), विक्रांत महादेव दाभोळकर (रा. वेलदूर), राजेश गोपिनाथ भोसले (रा. खालचापाट), श्रीमती विनया वसंत दाभोळकर (रा. वेलदूर) या सात जणांना पोलिस उपनिरिक्षक जाधव यांनी सोमवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित मिलिंद मदन जाधव (रा. तरीबंदर) याला यापूर्वीच अटक केली होती. त्याची कोर्टाने जामिनावर सुटका केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 28-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here