सांस्कृतिक स्पर्धेत ‘सडपा’ या लोकनृत्याने रौप्यपदक पटकावले

0

गुहागर : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेत सादर केलेल्या ‘सडपा’ या लोकनृत्याने रौप्यपदक पटकावले आहे. महाविद्यालयाने अंतिम फेरीत प्रवेश करीत यावर्षी पदकांची हॅट्ट्रिक साधली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 52 वी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतीक स्पर्धा अण्णामलाई महाविद्यालय कुर्ला येथे नुकत्याच पार पडल्या. यामध्ये विविध प्रकारची  40 लोकनृत्ये सादर झाली. यामधून खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या संघाने रौप्यपदक मिळविले आहे. सडपा हे झारखंडमधील लोकनृत्य आहे. यामध्ये तेजल डिके, कोमल साखरकर, रेश्मा बोटके, रसिका सांगळे, शिवानी भोसले, प्रणाली सुर्वे, मधुलिका असगोलकर, स्वाती गोसावी, नूतन साळवी, अनामिका पावरी, ऋतिका पालशेतकर आदींनी सहभाग घेतला. या नृत्याबाबत सहभागी विद्यार्थ्यांना लक्ष्मण पडवळ, अमित घरट, निनाद रेमो, प्रवीण कदम, रोहित रोहिलकर यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे यांनी संयोजन केले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष महेश भोसले, प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here