रत्नागिरी : नॅशनल एरोनॉटिकल स्पेस एजन्सी, यूएसए (नासा) यांच्यावतीने राष्ट्रीयस्तरावरील स्पेस अॅप चॅलेंज गॅलेक्टिक प्रॉब्लेम सॉल्व्हर या पूर्व पात्रता स्पर्धेचे आयोजन ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेनॉलॉजी, कांदिवली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या इन्फॉर्मे शन टेक्नोलॉजी विभागातील पूर्वा घाग, अमोल शेटे, ओंकार दळी, ओंकार रांजणे या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे.
