खेड: स्वीट मार्टमध्ये मुदतबाह्य केकची विक्री भोवली; दुकानाला सील

0

खेड : शहरातील शिवाजी चौक नजीकच्या चिखले यांच्या दुकान गाळ्यांमध्ये सुरू असलेल्या न्यूआयंगर्स केक शॉप अँड स्वीट मार्टवर शुक्रवारी दि. २७ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यामध्ये तपासणी अंती दुकानाला सील ठोकण्यात आले आहे. मुदतबाह्य झालेला केक विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील शिवाजी चौक येथील चिखले यांच्या दुकान गाळ्यात न्यू आयंगर्स केक शॉप अँड स्वीट हे दुकान काही महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. या दुकानातून निकेतन पाटणे यांनी गुरुवार दि. २६ रोजी सायंकाळी केक खरेदी केला होता. मात्र, पाटणे यांनी हा केक खाण्यासाठी उघडला असता तो खराब झाला असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ केकच्या दकानात अन्य नागरिकांना सोबत घेऊन धाव घेतली. तेथे त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना बोलावून घेतले. त्यावेळी पालिकेचे कर्मचारी परशुराम पाथरे, महेंद्र शिरगावकर, उपवले यांनी दुकानाची तपासणी केली असता त्यांना दुकानात खराब झालेल्या वस्तू आढळून आल्या. पालिका प्रशासनाने केक शॉप सील केले. यावेळी उपस्थित लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे संपर्कप्रमुख संदीप निवळकर यांच्या माध्यमातून पाटणे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात तक्रार केली. पाटणे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शुक्रवार दि. २७ रोजी सायंकाळी अन्न सुरक्षा अधिकारी बी. एम, भांबळे यांनी न्यू आयंगर्स केक शॉप अँड स्वीट या दुकानाची तपासणी केली. यावेळी कारवाईची व तपासणीची माहिती देताना भांबळे म्हणाले,या दुकानात अस्वच्छता आहे. दुकानाचे चालक गंगाधर अन्ने गौडा हे असून मालक इन्द्रेश लक्ष्मीगौडा हेआहेत. अन्नपदार्थ बनवण्या संदर्भात दुकान मालक यांच्याकडे कोणताही परवाना नाही. तसेच दुकानातील अनेक पदार्थात बुरशी सदृश घटक आढळून आले आहेत. तसेच दुकानातील उत्पादन क्षेत्रात अस्वछता आहे. पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालावर वापराचा महत्तम कालावधी स्पष्ट दिसून येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता दुकान बंद करण्यात येत आहे. जो पर्यंत दुकान चालवण्यासाठी आवश्यक परवाने व कायदेशीर बाबी दुकान मालकाकडून पूर्ण केल्या जात नाहीत तो पर्यंत न्यू आयंगर्स केक शॉप अँड स्वीट दुकान बंद राहील, अशी माहिती भांबळे यांनी दिली.

IMG-20220514-WA0009
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here