‘माखजन आरोग्य केंद्राला टाळे लावा’, ग्रामस्थांचा इशारा

0

संगमेश्वर : माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ता यांसह ग्रामस्थांकडून टाळे लावून आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनेक दिवसांपासून माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप शिंदे यांची बदली दापोली आसूद या ठिकाणी झाली आहे. लोकांच्या व ग्रामस्थांच्या रेट्यामुळे ती बदली रद्द करून त्यांना दोन दिवसांतच पूर्ववत माखजन आरोग्य केंद्रातच कायम ठेवण्यात येईल, असा शब्द आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांनी माखजन येथील पहिल्या आंदोलनादरम्यान दिला होता. मात्र, आज दहा दिवस उलटून गेले तरी डॉ. शिंदे यांची बदली माखजन येथे झाली नसल्याने सर्व ग्रामस्थ एकवटले असून, आक्रमक होऊन प्राथमिक आरोग्य केंद्रालाच टाळे लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 30-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here