लाच स्वीकारताना निवृत्त नायब तहसीलदार उल्हास कदम यांना पकडले

0

चिपळूण /रत्नागिरी : भूसंपादनाचा मोबदला तातडीने मिळवून देण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याच्या आरोपाखाली निवृत्त नायब तहसीलदार उल्हास नारायण कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. अटक केलेले उल्हास कदम महसूल विभागातून निवृत्त झाल्यानंतर भू संपादन विभागात सेवक म्हणून कार्यरत होते. गुहागरातील एच एनर्जीसाठी भू संपादन झाले आहे. तक्रारदाराची जमीनही या प्रकल्पासाठी संपादीत झाली आहे. या जागेचे ९ लाख रुपयांचा मोबदला मिळण्यासाठी तक्रारदार संबंधित भूसंपादन विभागात फेऱ्या मारत होते. परंतु त्यांना कोणीही दाद देत नव्हता. महसूल विभागातून निवृत्त झालेले उल्हास कदम भूसंपादन विभागात सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांनी हा मोबदला तातडीने मिळवून देण्यासाठी २१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक नितीन विजयकर आणि सहकारी अधिकाऱ्यांनी तक्रारीची खात्री केली. त्यानुसार कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले. तक्रारदाराला लाचेची रक्कम चिपळण प्रांत कार्यालयाशेजारी घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून १९ हजाराची रक्कम स्वीकारताना उल्हास कदम यांना रंगेहाथ पकडण्यात आले.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here