शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा माहिती कोश अद्ययावत करण्याची कार्यवाही

0

रत्नागिरी : अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश दरवर्षीप्रमाणे अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. दि. १ जुलै २०१९ या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. तसेच जुलै २०१९ या संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशिलवार माहितीही गोळा करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचा-यांची माहिती नोंदविण्यासाठी /अद्ययावत करण्यासाठी माहिती आज्ञावली तयार करण्यात आली आहे. या आज्ञावलीमध्ये कर्मचाऱ्यांची माहिती नोंदविण्यासाठी/ अद्ययावत करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष -२०१९ अंतर्गत जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना माहिती नोंदणीसाठी Login ID d Password देण्यात येत आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी ते जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रत्नागिरी या कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावेत. ही माहिती नोंदणीसाठी माहिती आज्ञावली http:// mahasdb.maharashtra. gov.in/CGE या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व आहरण व संवितरण अधिकायांनी लॉगीन व पासवर्ड जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रत्नागिरी येथून प्राप्त करुन घेऊन आपल्या अधिपत्याखालीलकर्मचाऱ्यांची माहिती संगणक आज्ञावली मध्ये नोंदवावी/अद्ययावत करावी. माहिती नोंदणी पूर्ण करून माहिती सादर केल्याचे पहिले प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकीकार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावे व सदर प्रमाणपत्र नोव्हेंबर, २०१९ च्या वेतन देयकासोबत कोषागार/अधिदान व लेखा कार्यालयास सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here