मार्लेश्वर देवस्थानमधील दुकाने धोकादायक स्थितीत

0

देवरूख : श्रीमार्लेश्वर देवस्थान सह्याद्रीच्या कडेकपारीत मारळ नगरीत वसलेले आहे. या देवस्थानकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असल्याने अनेकांनी देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर दुकाने थाटली आहे. काही दुकाने दरीच्या बाजूने असून लोखंडी खांबावर उभी आहेत.हीदकाने अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. याबाबत गाळेधारकांना प्रशासनाच्यावतीने नोटीस बाजावण्यात आली होती. मात्र आजतागायत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यातील एखादे दुकान कोसळल्यास दुर्घटना होऊ शकते. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतांश दुकाने सुस्थितीत आहेत. मात्र २५ हून अधिक गाळेधारकांनी लोखंडी अँगलच्या माध्यमातून दुकानाचे विस्तारीकरण केल्याचे चित्र आहे. दरीच्या बाजूने दुकाने असल्याने भूस्खलन झाल्यास पूर्ण दुकान जमिनदोस्त होऊ शकते. याचा सर्वाधिक धोका यात्रेच्यावेळी असतो. यात्रेवेळी भाविक, पर्यटकांनी प्रत्येक दुकान फुल्ल झालेले असते. काही लोखंडी अँगल गंजलेले असून यावर क्षमतेपेक्षा जास्त भार पडल्यास दुकान कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याकडे शासकीय यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे. सुरक्षेच्यादृष्टीने देवरूख पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून संबंधित गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र यानंतर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here