मुख्यमंत्र्यांनी आ. राजन साळवींचे केले कौतुक

0

राजापूर : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आमदार डॉ. राजन साळवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ना. उद्धव ठाकरे यांनी आ. राजन साळवी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल सन्मान केला. त्यावेळी आ. राजन साळवींनी विविध विषयांवर चर्चा केली. अनेक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. मतदार संघातील जनतेने शिवसेनेवर व आमदार डॉ. राजन साळवींच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, ना. आदित्य ठाकरे, पालकमंत्री अॅड. अनिल परब आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:24 PM 01-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here