रत्नागिरी जुनी पेन्शन संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी राहुल अलकटवार यांची नियुक्ती

0

जाकादेवी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा रत्नागिरीच्या अध्यक्ष पदी राहुल अलकटवार तर उपाध्यक्षपदी सौ. अमृता पानगले व व्यंकट चांडसुरे यांची नियुक्ती करण्यात आली. रत्नागिरी येथे संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अंकुश चांगण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सभेत रत्नागिरी तालुका नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

संघटनेचे इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे :
कार्याध्यक्ष- तुकाराम मुरकुटे, सचिव-शरद खांडेकर, कोषाध्यक्ष-नितीन राडकर, तालुका संघटक-नवनाथ कुटे, तालुका प्रसिद्धी प्रमुख-अनंत चाटे, तालुका प्रसिद्धी प्रमुख-सुजित वाफेलकर, तालुका सल्लागार-शिवजी घुटे, सहसचिव- रामनाथ बने, सहसचिव- उल्हास कुलकर्णी, जिल्हा संघटक-सुहास पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- महेंद्र ढाकणे इत्यादींची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे जिल्हा संघटने तर्फे अभिनंदन करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:33 PM 01-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here